
कोल्हापुरात ११ ते २१ सप्टेबर या कालाधवीत दहा दिवसांचा जनता कर्फ्यू
कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता कोल्हापुरात ११ ते २१ सप्टेबर या कालाधवीत दहा दिवसांचा जनता कर्फ्यू होणार आहे. नागरीकांसह व्यापारी उद्योजकांनी जनता कर्फ्यू पाळावा अशी विनंती महापौर निलोफर आजरेकर यांनी केली आहे.
जनता कर्फ्यूसंदर्भात महापालिकेच्या शाहू सभागृहात सर्वपक्षीय कार्यकर्ते, तरुण मंडळे, व्यापार, उद्योग संघटनांच्या प्रतिनिधींची व्यापक बैठक झाली. या बैठकीत महापौरांनी ही विनंती केली. दरम्यान चेबर ऑफ कॉमर्सतर्फे ११ ते १६ सप्टेबर या दरम्यान व्यापार बंद ठेवण्यात येणार आहे
www.konkantoday.com