आंतरराष्ट्रीय कीर्तीचे छायाचित्रकार व रत्नागिरीचे सुपुत्र प्रोफेसर श्रीकांत मलुष्टे यांचे दुःखद निधन
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे छायाचित्रकार व रत्नागिरीचे सुपुत्र प्रोफेसर श्रीकांत गोपीनाथ मलुष्टे यांचे काल रात्री मुंबई येथे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले छायाचित्रण क्षेत्रात त्यानी अनेक मोलाची कामगिरी केली होती याशिवाय या क्षेत्रात अनेक संस्थांवर ते सल्लागार म्हणून काम करीत होते
श्रीकांत मलुष्टे यांचा जन्म रत्नागिरीत झाला तेलीआळी येथे राजहंस फोटो स्टुडिओ हा पूर्वीच्या काळात त्यांचे वडील गोपीनाथ मलुष्टे यांनी सुरू केला होता मलुष्टे यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण रत्नागिरीत झाले महाविद्यालयीन काळात त्यांनी अनेक नाटकांत काम केले साहित्य क्षेत्रातही त्यांना आवड होती महाविद्यालयीन शिक्षणानंतर ते मुंबई येथे महाराष्ट्र कॉलेज मध्ये फिजिक्स या विभागाचे विभागप्रमुख म्हणून काम करू लागले त्या काळातही त्यांनी नाट्यक्षेत्रातील आवड जपली त्यांनी व्यावसायिक नाटकात काम केले निर्माल्य वाहिले चरणी या नाटकात राजा परांजपे तसेच ललित सिंघल यांच्या पाच वाजून पाच मिनिटे या नाटकांत त्यांनी भूमिका बजावल्या एकीकडे हे सुरू असतानाच वडिलांपासून आलेला छायाचित्रणाची कला व गुण असल्याने त्यांनी छायाचित्र क्षेत्रातही काम सुरू केले मुंबईसारख्या ठिकाणी त्यांनी सत्यम ऍकॅडमी ऑफ फोटोग्राफी या नावाने फोटोग्राफी प्रशिक्षण संस्था सुरू केली सहज मोकळी समजवण्याची पध्दत व छायाचित्रांत क्षेत्रातील बारकावे सांगण्याच्या पध्दतीमुळे छायाचित्रण क्षेत्रात त्यांनी हजारो विद्यार्थी घडविले ते स्वतः उत्कृष्ट छायाचित्रकार असल्याने अनेकवेळा आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांच्या छायाचित्रणाची दखल घेऊन पारितोषिकाची निवड झाली कोकणविषयीव रत्नागिरी विषयी त्यांना खूप प्रेम होते त्यातूनच त्यांनीकोकणातीलसमुद्रकिनारे ,किल्ले ,ग्रामीण भागातील हजारोंच्या घरात छायाचित्रे टिपून त्यांनी जागतिक पातळीवर नेली व्यक्ती छायाचित्रे हेदेखील त्यांचे खास वैशिष्टय़ होते
छायाचित्र क्षेत्रात सोसायटी ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष, कला अकादमीचे सदस्य मुंबई विद्यापीठ व डी एन डी टी ,मुंबई अॅकॅडमी ऑफ लाइफ स्मार्ट आदी संस्थांवर त्यांनी सल्लागार म्हणून काम केले होते त्यांनी मुंबई पासुन अनेक ठिकाणी छायाचित्र प्रदर्शने भरवली शिवसेना भवनात भरवलेल्या छायाचित्र प्रदर्शनाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जातीने भेट देऊन कौतुक केले होते तसेच ऑल इंडिया फोटोग्राफी प्रदर्शनाच्या वेळी एम एफ हुसेन यांनीही भेट दिली होती याशिवाय त्यांनी छायाचित्र क्षेत्रात लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, सामना पासून अनेक इंग्रजी दैनिकांतून छायाचित्रणविषयक लेख व कॉलम प्रसिद्ध केले होते याशिवाय त्यांचे असा मी तसा मी हे आत्मचरित्र प्रसिद्ध केले होते Glimpses into my life हे इंग्रजी पुस्तक व छंद छायाचित्रणाचा हे मराठी पुस्तक त्यांनी प्रसिद्ध केले होते त्याला मोठा प्रतिसाद मिळाला होता
श्रीकांत मलुष्टे यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त होत आहे
त्यांच्यामागे पत्नी, विवाहित मुलगा, सून, विवाहित मुलगी जावई असा परिवार आहे
www.konkantoday.com