
टिपू सुलतानचे नाव मैदानाला देण्यास आमचाही विरोध खासदार विनायक राऊत यांचीरोखठोक भूमिका
मुंबईतील मालाड येथील मैदानाचा टिपू सुलतानचे नाव देण्यावरून भाजप व अन्य हिंदुत्ववादी संघटनानी विरोध केला होता व आंदाेलन केले हाेते मात्र मुंबईचे पालकमंत्री व काँग्रेसचे नेते अस्लम शेख यांनी विरोध असूनही या मैदानाला हे नाव दिले होते राष्ट्रवादीनेही त्याचे समर्थन केले होते रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्य़ाचे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी मात्र मालाडमधील मैदानाला टिपू सुलतान यांचे नाव देण्याचा आमचाही विरोध असल्याचे स्पष्ट केले आहे अशा प्रकारे एखाद्या मैदानाला टिपू सुलतान यांचे नाव देणे योग्य नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर यांनी जी भूमिका व्यक्त केली आहे ती योग्य आहे असेही राऊत यांनी स्पष्ट केले आहे
www.konkantoday.com
पहा व्हीडीयो👇🏻