दापोली शहरातील लॉटरी केंद्राला लागली आग
दापोली : शहरातील गुरुकृपा कॉम्प्लेक्स येथील लॉटरी सेंटरला आग लागण्याची घटना घडली असून सुदैवाने जीवित हानी टळली. २६ रोजी सकाळी अचानक या लॉटरी सेंटर गाळ्यातून धूर येऊ लागला. परिसरातील नागरिकांनी धाव घेत ही आग आटोक्यात आणली. दापोली एसटी स्टँडनजीक हे गुरुकृपा कॉम्प्लेक्स असून हा परिसर कायम गजबजलेला असतो. येथे बीयर शॉपी, देशी दारू दुकान आणि हे लॉटरी सेंटर असल्याने या लॉटरी सेंटरमध्ये कायम वर्दळ असते. २६ रोजी सकाळी या केंद्राला आग लागून नुकसान झाले.