
एका ग्राहकाने वीज तोडण्यास विरोध केला म्हणून संपुर्ण गावचा विजपुरवठा महावितरण कर्मचाऱ्यांनी खंडीत केल्याचा आरोप
पाचल महावितरण विभागाच्या अनागोंदी कारभारा विरोधात तुळसवडे उपसरपंच संजय कपाळे यांनी कुटुंबासह २६ जानेवारी रोजी उपोषणास बसण्याचा ईशारा दिला आहे.विज बील भरण्यास विलंब झाला म्हणून कोणतीही पुर्वकल्पना न देता घरात घुसुन महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी विज कनेक्शन तोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप कपाळे यांनी केला आहे.
वीज तोडण्यास विरोध केला म्हणून संपुर्ण गावचा विजपुरवठा महावितरण कर्मचाऱ्यांनी खंडीत केल्याचे कपाळे यांनी सांगितले. त्यामुळे महावितरणच्या या मुजोरी विरोधात आपण २६ जानेवारी रोजी कुटुंबासह आमरण उपोषणाला बसणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शनिवारी दुपारी ४ वाजता कोेणतीही पुर्वकल्पना न देता महावितरणचे चार कर्मचारी आपल्या घरात घुसले, व त्यांनी थेट मिटर बंद केला. यावेळी आपली पत्नी घरात एकटी होती, तीने त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता तीच्याशी त्यांनी वाद घातल्याचे कपाळे यांनी सांगितले. आपण मिटर कट करण्याबाबतचे पत्र दाखवा अशी विचारणा केली असता असे कोणतेही पत्र नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यावेळी आपण मिटर तोडण्यास विरोध केला व त्यांना घराबाहेर जाण्यास सांगितले. यानंतर त्यांनी संपुर्ण गावचा विजपुरवठा डीपी बंद करून बंद केला आहे
www.konkantoday.com