
रस्ता मोजणीने अनेक घरे बाधित होणार
चिपळूण तालुक्यातील टेरव येथे शासकीय रस्त्यालगत घराचे बांधकाम केल्याची तक्रार झाल्यानंतर जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिकार्यांनी त्याची पाहणी करत याबाबतचा अहवाल देण्यात येणार आहे. मात्र तक्रारीनुसार गावातील जिल्हा परिषद मालकीच्या रस्त्यांची मोजणी केल्यास टेरवमधील रस्त्यालगतच्या विविध वाड्यांतील मोठ्या प्रमाणात घरे बाधित होतील, असा अंदाज पाहणीच्या निमित्ताने वर्तवण्यात आला.
टेरव येथील एकनाथ माळी यांनी तक्रार करत दीपाली घडशी यांनी शासकीय रस्त्यालगत बेकायदेशीर बिनापरवाना बांधकाम केल्याची तक्रार करत उपोषणाचा
इशाराही दिला होता. या तक्रारीवर घडशी यांनी आक्षेप घेत गावात रस्त्याच्या कडेला अनेकांनी बांधकाम केले आहे, त्यावर कारवाई कोण करणार अशी भूमिका घेतली होती. बेकायदा विनापरवाना घरांबाबत कारवाईचे अधिकार शासनाने ग्रामपंचायतीला दिले आहेत. त्यानुसार जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून टेरव वेतकोंडवाडी येथील रस्त्याची पाहणी करण्यात आली.
या पाहणीदरम्यान टेरव येथील ग्रामपंचायत हद्दीतील जिल्हा परिषद अखत्यारितील सर्व रस्त्याचे रेखांकन केले जाणार होते. मात्र पहिल्या टप्यात तक्रार झालेल्या ठिकाणची पाहणी करण्यात आली. टेरव येथील शासकीय रस्त्यांची मोजणी केल्यास ६०हून अधिक घरे बाधित होण्याची शक्यता वर्तवण्यात आली.www.konkantoday.com




