गुजरातच्या घुसखोर मासेमारी नौकेला पकडले; 92 हजारांची मासळी जप्त, मत्स्य व्यवसाय विभागाची कारवाई

0
88

रत्नागिरी : परप्रांतीय नौकांचा रत्नागिरी समुद्रात धुडगूस सुरूच आहे.
दि. 21 रोजी रत्नागिरीच्या 11 नॉटिकल मैल क्षेत्रात गुजरातची नौका मासेमारी करीत असताना पकडण्यात आली. तिला मिरकरवाडा येथे अटकावून ठेवण्यात आले आहे.
मत्स्यव्यवसाय विभागाची गस्ती नौका माऊलीसाईने ही कारवाई केली. अटक केलेल्या नौकेचे नाव बनेश्वरगंगा असून नौकामालकाचे नाव सुयानी गोपाल रतिलाल असे आहे. नौकेचा क्रमांक IND-GJ-32-MM-3153 आहे. रात्र 8.00 वा. ही नौका मिरकरवाडा बंदरात आणण्यात आली. नौकेवरील मासळीचा जाहीर लिलाव करण्यात आला असून मासळी रक्कम रु.92 हजार रक्कम प्राप्त झाली आहे. ही नौका मिरकरवाडा येथे अटकावून ठेवण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here