शिवसेनेचं खच्चीकरण करायचं आणि राष्ट्रवादीचं बळ वाढवायचं अशी छुपी निती आमच्याच काही नेत्यांची हाेती आमदार योगेश कदम यांचा आरोप

दापोलीत राष्ट्रवादीची सत्ता आली तर मंडणगड नगरपंचायतीत शिवसेनेचे अधिकृत उमेदवार निवडून न येता अपक्ष उभे राहिलेले शिवसेनेचे आठ उमेदवार निवडून आले.निकालाच्या पाश्र्वभूमीवर आमदार योगेश कदम यानी नाराजी जाहीर करत मनातील सल बोलून दाखवली आहे. शिवसेनेचं खच्चीकरण करायचं आणि राष्ट्रवादीचं बळ वाढवायचं अशी छुपी निती आमच्याच काही नेत्यांची होती असा गंभीर आरोप योगेश कदम यांनी केला आशिवसेनेचं खच्चीकरण करायचं आणि राष्ट्रवादीचं बळ वाढवायचं अशी छुपी निती आमच्याच काही नेत्यांची होती असा आरोप दापोली मंडणगडचे आमदार आणि रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम यांनी केला आहे.
“दापोलीच्या नगरपंचायतीत पाच वर्ष शिवसेनेची सत्ता होती. ती आता शिवसेनेकडे नसून राष्ट्रवादीकडे गेली आहे. फायदा कोणाचा तर राष्ट्रवादीचा झाला आहे. शिवसेनेचा फायदा झालेला नाही. जे शिवसेनेच्या एबी फॉर्मवर निवडून आले आहेत त्यापैकी सहापैकी चार राष्ट्रवादीचे लोक आहेत. ते शिवसैनिक नाहीत. म्हणजे एबी फॉर्म भरण्याच्या दोन मिनिटं आधी त्यांच्या गळ्यात पट्टे घालण्यात आले. हे निर्णय शिवसैनिकांनी मान्य केले नाहीत,” असं योगेश कदम यांनी सांगितलं आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button