
जयगड कासारी येथे लाटांच्या उधाणाने वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला
मासे गरवायला गेलेला लाटांच्या उधाणाने वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह बुडाला तिथून १००मीटर परिसरात सोमवारी सकाळी आढळून आला. रत्नागिरी तालुक्यातील जयगड येथील ही घटना आहे.वीरांची खपले (१८, पन्हळी, जयगड) असे हा तरुण रविवारी आपल्या मित्रांसमवेत मासे गरवण्यासाठी जयगड कासारी येथील बंधाऱ्यावर गेला होता. मात्र अमावस्या असल्याने समुद्राला मोठी भरती होती. त्यामुळे पाण्याला करंट होता. यातच वीरांचा पाण्यात पडला आणि प्रवाहासोबत वाहून गेला हाेता
www.konkantoday.com