
व्हॉट्स अँप ग्रुपवरील आक्षेपार्ह चॅटिंग भोवले; दापोलीत तिघांवर गुन्हा दाखल
दापोली : तालुक्यातील कोंढे या गावात व्हाट्सअँप ग्रुपवर आक्षेपार्ह चॅटिंग केल्याप्रकरणी ग्रुपमधील तिघांवर दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयित प्रफुल्ल राजीवले, स्वप्निल राजीवले, राहुल गोरीवले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांना दापोली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढे गोरीवलेवाडी येथील काही ग्रामस्थांचा क्रिकेट लव्हर्स असा ग्रुप आहे. या ग्रुपमध्ये मुले, मुली तसेच प्रौढ यांचादेखील समावेश आहे. या ग्रुपवर एका मुलीच्या टोपण नावाने आक्षेपार्ह मेसेज करण्यात आला. ग्रुपमधील काही सदस्यांनी आक्षेपार्ह प्रतिसाद नोंदविला म्हणून दापोली पोलिस ठाण्यात पीडित तरुणीने फिर्याद नोंदविली. ही घटना 16 जानेवारी रोजी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी अधिक तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल साक्षी गुजर करीत आहेत.
www.konkantoday.com