
पर्सिसन नेट कायद्याच्या विरोधात आंदोलन चालू असतानाच ,१५ दिवसात जिल्ह्यातील ३६ पर्ससीन नेट मच्छिमार नौका वर मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त कार्यालयाकडून कारवाई
पर्सिसन नेट कायद्याच्या विरोधात आंदोलन चालू असतानाच गेल्या १५ दिवसात जिल्ह्यातील ३६ पर्ससीन नेट मच्छिमार नौका वर मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त कार्यालयाकडून कारवाई केल्याचे उघड झाले आहे
पर्ससीन नेट नौकांद्वारे मासेमारी कायद्याचे उल्लंघन करून राजरोस बेकायदेशीर मासेमारी सुरू आहे.गेल्या १५दिवसात जिल्ह्यातील ३६ पर्ससीन नेट मच्छिमार नौका मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त कार्यालयाने पकडल्या आहेत.अजूनही मोठ्या प्रमाणात कायद्याचे उल्लंघन करून मासेमारी सुरू आहे.
महाराष्ट्र सागरी मासेमारी कायदा मंजूर झालेला आहे. पर्ससीन नेट मच्छिमारांकडून आंदोलन सुरू आहे. १जानेवारीपासून पर्ससीन नेट मासेमारी बंद झाली. महाराष्ट्र राज्याच्या जलधीक्षेत्रात पर्ससीन नौकाना मासेमारी करण्यास परवानगी नाही तरीही नियम धाब्यावर बसवून जोरदार बेकायदेशीर मासेमारी सुरू आहे.
बेकायदेशीर मासेमारी विरोधात पारंपारिक मच्छिमार सातत्याने आवाज उठवत आहेत. महाराष्ट्र सागरी मासेमारी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करा अशी मागणी पारंपारिक मच्छिमारांकडून केली जात आहे.
www.konkantoday.com