विलीनीकरणाशिवाय माघार घेणार नाहीच-एसटी कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम
कामगार न्यायालयाने एसटी कामगारांचा संप बेकायदेशीर ठरवला आहे. मात्र आम्ही विलीनीकरणाशिवाय माघार घेणार नाहीच अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. राज्यातील विविध भागातील एसटी कर्मचाऱ्यांचे आझाद मैदानात आंदोलन सुरूच आहे.एसटी कर्मचाऱ्यांनी सांगितले की, विलीनीकरणाची प्रक्रिया वेळखाऊ असल्याचे सरकारकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे हा न्यायालयात लढा सुरू आहे. कामगार न्यायालयाने हा संप बेकायदेशीर ठरवला आहे. मात्र उच्च न्यायालयात आम्हाला नक्कीच न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे, त्यामुळे आम्ही आझाद मैदानातच राहणार आहोत.
www.konkantoday.com