राज्यात हल्ली अंधभक्तांचा सुळसुळाट -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा भाजप आणि मनसेला टाेला

राज्यात हल्ली अंधभक्तांचा सुळसुळाट झाला असून सगळीकडे उदोउदो सुरू झाला आहे. जिकडे फायदा तिकडे तो झुकत असल्याची टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी भाजप आणि मनसेवर केली.ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी लिहिलेल्या ‘आंबेडकर ऑन पॉप्युलेशन पॉलिसी- कॉन्टेपररी रिलिवन्स’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोळळय़ात मुख्यमंत्री बोलत होते. या कार्यक्रमात दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून सहभागी होताना ठाकरे यांनी भाजप आणि मनसेवर टीकास्त्र सोडताना, आम्ही बाबासाहेबांचे भक्त आहोत. भक्त म्हणजे अंधभक्त नाही. अंधभक्तांचा हल्ली सुळसुळाट आहे. अंधभक्त काही काही वेळेला दैवत बदलू शकतो. पण भक्त हा आपल्या दैवताच्या विचारांवर आयुष्यभराची वाटचाल करतो. भक्त आणि अंधभक्त यांच्यात हा फरक असल्याचा टोमणाही त्यांनी यावेळी लगावला.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button