
खेड तालुक्यातील वेरळ फाट्यानजिक गुटखा विक्री प्रकरणात आणखी एकाचा सहभाग
खेड तालुक्यातील वेरळ फाट्यानजिक ८ लाख ८० हजार रुपये किंमतीच्या गुटखा विक्रीप्रकरणी येथील पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या असतानाच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा-सावंतवाडी येथील आबा शिरसाट/ शिरसाट नामक व्यक्तीचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. त्याच्याकडूनच गुटखा खरेदी केल्याची कबुली संशयितांनी दिल्याची माहिती समोर आली आहे.
पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने टेम्पोमधून गुटख्याची वाहतूक करणार्या प्रेमल शंकर मोकल, जगदीश हरिश्चंद्र मोरे यांना गजाआड केले आहे. गुटखा वाहतुकीसाठी वापरलेला ९ लाख रुपये किंमतीचा टेम्पोही पोलिसांनी हस्तगत केला आहे.
www.konkantoday.com