
एक कोटी लाच घेतल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता,ॲड. संकेत घाग यांनी लढवली होती बाजु
पुणे येथील विशेष न्यायालय सीबीआय या कोर्टाने के. बी. महाडिक सीनियर इंटेलिजन्स ऑफिसर पुणे, यांची, रक्कम रुपये एक कोटी ची लाच रक्कम घेतल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली.
सदरच्या श्री. कृष्णराव महाडिक, सेंट्रल एक्साइज सुपरिटेंडेंट पुणे यांचे विरुद्ध असा दोषारोप होता की, त्यांनी अन्य आरोपी दिनेश भरूका मेसर्स ओम साईराम स्टील अँड अलॉईज प्रायव्हेट लिमिटेड औरंगाबाद, याच्याशी संगनमत करून व कट करून सदरचा गुन्हा केला.
सीबीआयने ठेवलेल्या दोषारोपपत्रा प्रमाणे आरोपी भरुका याने त्याचे व्यापाराचे कामी कोट्यावधी रुपयांची एक्साईज ड्युटी भरलेली नव्हती. यासंदर्भात एक्साईज सुपरिटेंडेंट महाडिक यांनी त्यांचे कार्यालयावर धाड टाकली व तेथील त्यांचा सर्व रेकॉर्ड, लॅपटॉप, पेन ड्राइव्ह व अन्य दस्त ऐवज जप्त केला. या पार्श्वभूमीवर श्री भरुका यांनी महाडिक यांची बेकायदेशीर मदत घेतली. त्यानुसार श्री महाडिक यांनी जप्त मुद्देमाल व लॅपटॉप यांच्यामधील डाटा शी छेडछाड केली आणि 3 कोटी 25 लाख एक्साईज ड्युटी थकित असल्याचे दर्शविले. प्रत्यक्षात न भरलेली एक्साईज ड्युटी ही सुमारे 10 कोटी इतक्या रकमेची होती.
या पार्श्वभूमीवर दिनांक 7 जानेवारी 2011 रोजी भरुका यांच्याकडून सीनियर इंटेलिजन्स ऑफिसर महाडिक यांना सुमारे 1 कोटी इतकी रक्कम लाच म्हणून मिळणार असल्याची खबर सीबीआय ऑफिसर पुणे यांना मिळाली. त्याप्रमाणे सीबीआय पथकाने सापळा आखून व रेड टाकून श्री महाडिक, श्री भरूका यांचे सह अन्य एक असामी यांना कोहिनूर इस्टेट पुणे येथे दोन वाहनातून एक कोटी रुपये रकमेची बॅग हस्तांतरित करत असताना प्रत्यक्ष पकडले.
या पार्श्वभूमीवर के.बी. महाडिक सीनियर इंटेलिजन्स ऑफिसर सुपरिटेंडेंट ऑफिस ऑफ सेंट्रल एक्साईज पुणे व श्री दिनेश भरुका यांचे विरुद्ध विशेष न्यायालय सीबीआय पुणे यांचे कोर्टात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याचे कलम 13(2), 13(1) (d), 12, 7 तसेच भा द वि कलम 204, 120-ब अन्वये खटला भरवण्यात आला.
प्रस्तुतचे कामी सीबीआय यांच्यावतीने 15 साक्षीदार तपासण्यात आले. प्रस्तुतचे कामी सीनियर इंटेलिजन्स ऑफिसर सेंट्रल एक्साईज पुणे श्री महाडिक यांचे वतीने रत्नागिरीतील सुप्रसिद्ध *ऍड. संकेत घाग* यांनी काम पाहिले.