
रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर जवळील एकता मार्ग भागात पाण्याची कमतरता , नागरिकांचे होत आहेत हाल मात्र अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर जवळील एकता मार्ग भगत पाण्याची कमतरता जाणवत आहे या कमतरतेला नगर परिषदेचा कारभार जबाबदार आहे या भागातील उताराच्या बाजूला मुबलक पाणी आणि चढावाच्या बाजूला थेब भर पण पाणी नाही अशी अवस्था निर्माण झाली आहे. सध्या नगरपरिषद सोमवार व गुरुवार पाणी बंद ठेवत आहे त्यामुळे उरलेल्या वारी व्यवस्थित पाणी पुरवठा व्हावा अशी नागरिकांची अपेक्षा असते मात्र या भागात बुधवारी अगदी थोडे पाणी आले त्या नंतर गुरुवारी पाणीच नव्हते आज एका बाजूला पाणी दुसऱ्या बाजूला पाणी नाही आशी अवस्था या भागातील रहिवाशांची झाली आहे . याबाबत त्या भागातील काही नागरिकांनी संबंधित अधिकांऱ्यांना फोन केला असता ते फोन उचलत नाहीत किंवा नॉट रिचेबल येतात . काही ठीकाणी वशिल्याच्या भागात टॅकर पाठवले जातात आणि आजू बाजूचे बघत बसतात अशी दुपट्टी भूमिका र . न . प . चे काही कर्मचारी करताना दिसतात . मुख्य अधिकारी इतर कामा मध्ये व्यस्त असल्या कारणाने ते ही लक्ष घालत नाहीत त्या मुळे सामान्य नागरीकांचे पाण्यामुळे हाल झाले आहेत .www.konkantoday.com