
रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीसाठी शिंदे शिवसेनेच्या नऊ उमेदवारांची घोषणा, काही ठिकाणी नव्यांचा समावेश तर इतर ठिकाणी जुन्यांना प्राधान्य
रत्नागिरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शिंदे शिवसेना सक्रिय झाले असून आज शिंदे शिवसेनेने आपल्या नऊ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत काही तरुण उमेदवारांचा तर काही ठिकाणी जुन्या उमेदवारांनाच प्राधान्य देण्यात आले आहे पूर्वीच्या काही नगरसेवकांचे पत्तेही कट झाले आहेत
आज सायंकाळी पत्रकार परिषद घेत नऊ उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे निवडणूक प्रभारी यशवंत जाधव, आमदार किरण सामंत, जिल्हाप्रमुख राहुल पंडित यांच्या उपस्थितीत पहिली यादी जाहीर करण्यात आली. या जाहीर केलेल्या उमेदवारांमध्ये प्रभाग क्रमांक 2 मधून निमेश नायर, प्रभाग 3 राजन शेट्ये, प्रभाग 5 सौरभ मलुष्ट, प्रभाग 7 गणेश भारती, प्रभाग 7 श्रध्दा हळदणकर, प्रभाग 8 दतात्रय साळवी, प्रभाग 9 विजय खेडेकर, प्रभाग 13 सुहेल साखरकर आणि 13 मधून आफरीन होडेकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
रत्नागिरी नगर परिषद निवडणूकीसाठी महायुतीतर्फे उद्या १५ उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत. शिवसेना शिंदे गटातर्फे ९ उमेदवार तर भारतीय जनता पार्टीतर्फे ६ उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी महायुतीतर्फे भव्य रॅली काढण्यात येईल असे सांगण्यात आले.
जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, आमदार किरण सामंत, आमदर निरंजन डावखरे, भाजपाचे जिल्हा नेते अतुल काळसेकर, सचिन वहाळकर, दिपक पटवर्धन, शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत.




