आयुष मंत्रालयाच्या अधिपत्याखाली विभागीय होमिओपॅथी संशोधन संस्थेचे महाराष्ट्रातील पहिले रुग्णालय खारघरमध्ये सुरू
केंद्रीय होमिओपॅथी संशोधन संस्थाअंतर्गत आयुष मंत्रालयाच्या अधिपत्याखाली विभागीय होमिओपॅथी संशोधन संस्थेचे महाराष्ट्रातील पहिले रुग्णालय खारघरमध्ये सुरू झाले आहे. रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून आयुष मंत्रालयाच्या सूचनेनुसार संबंधित रुग्णालयाचा बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) कार्यान्वित करण्यात आला आहे.यात आयुष रुग्णालयाचे प्रभारी संशोधन अधिकारी डॉ. रमेश बावस्कर हे काम पाहत आहेत.
नियोजनबद्ध उभारलेल्या या वास्तूचे काम केंद्र सरकारच्या निर्देशानुसार सिडकोने पूर्ण केले आहे. २० रुपयांची फी भरून रुग्णांना या ठिकाणी उपचार घेता येणार आहेत. खारघर सेक्टर १८ मध्ये प्लॉट नं. ३८, ३९ या भूखंडावर हे रुग्णालय आहे.सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत ओपीडी सुरू असेल. लवकरच या ठिकाणी सोनोग्राफी, एक्स-रे, सिटी स्कॅन मशिनरीदेखील कार्यान्वित होणार असल्याची माहिती रुग्णालयाचे प्रभारी संशोधन अधिकारी डॉ. बावस्कर यांनी दिली.रुग्णालयात होमिओपॅथी पद्धतीने अद्ययावत उपचार केले जाणार आहेत. यामध्ये सर्व प्रकारच्या असाध्य रोगांचा समावेश आहे. ॲलर्जी आजारांवर याठिकाणी संशोधन केले जात असून त्याचा फायदा रुग्णांना होणार आहे.
www.konkantoday.com