
मच्छिमारी सुरू करण्याबाबत मच्छिमारांची मानसिकता नाही
मच्छिमारांसाठी मच्छिमारीचा हंगाम ऑगस्ट महिन्यात सुरू होणार असला तरी सध्या मच्छिमार बांधव अडचणीत आहेत. कोरोनाचा फटका इतर क्षेत्राप्रमाणे मच्छिमार क्षेत्रालाही बसला आहे. परराज्यातून मच्छिमारीकरिता मोठ्या प्रमाणावर खलाशी येत असतात परंतु ते सध्या आपल्या प्रांतात गेल्याने खलाशांचीही अडचण निर्माण झाली आहे. त्याशिवाय सरकारने आश्वासन देवूनही जिल्हा डिझेल परतावा रखडला आहे. त्यामुळे अनेक मच्छिमारांची आर्थिक परिस्थिती बिकट असून कर्जाचे हप्तेही थकलेले आहेत.
त्यामुळे मच्छिमार व्यवसाय सुरू झाला तरी त्यासाठी आवश्यक असलेले आर्थिक पाठबळ मच्छिमारांकडे नसल्याने अवघे काही टक्केच मच्छिमार आपला मच्छिमार व्यवसाय सुरू करतील असा अंदाज आहे. नारळी पौर्णिमेनंतरच मच्छिमारीला खर्या अर्थाने सुरूवात होणार आहे.
www.konkantoday.com