राज्य नाट्यस्पर्धा पुढे ढकलण्याच्या निर्णयावर कलाकारांकडून संमिश्र प्रतिक्रिया
कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने १५ जानेवारीपासून सुरू होणार असलेली साठावी राज्य नाट्यस्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय नुकताच जाहीर केला.या निर्णयाबाबत कलाकारांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या.
स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली असताना हा निर्णय झाल्याने कलाकारांनी काहीसे नाउमेद झाले असल्याची भावना व्यक्त केली, मात्र दुसरीकडे काही संघांमधील कलाकारांनाच कोरोनाची लागण झाली होती. अशा परिस्थितीत नाटकाचा प्रयोग करणे शक्य नसल्याने या संघांनीच स्पर्धा रद्द करण्याची मागणी सरकारला केली होती. या मागणीचा विचार करून स्पर्धा पुढे ढकलल्याने समाधान देखील व्यक्त करण्यात आले. सरकारने हा निर्णय जाहीर करताना परिस्थितीचा आढावा घेऊन लवकरच नवीन वेळापत्रक जाहीर केले जाईल, असे सांगितले आहे. त्याला अनुसरून परिस्थिती निवळल्यानंतर लवकरात लवकर स्पर्धेचे आयोजन व्हावे, अशी मागणीही काहींनी केली आहे.
www.konkantoday.com