आठ आसनी चारचाकी वाहनांमध्ये आता ६ एअरबॅग अनिवार्य
चारचाकी वाहनांमध्ये प्रवास करणार्यांची सुरक्षा वाढवणयाच्या दृष्टीने केंद्रीयमंत्री ना. नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली आहे. आठ आसनी चारचाकी वाहनांमध्ये सहा एअरबॅग अनिवार्य करण्यात आले असल्याचे ना. नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. एअरबॅग अनिवार्य करण्याला मंजुरी दिली आहे, असेही ना. गडकरींनी स्पष्ट केले. केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने याआधीच १ जुलै २०१९ पासून चालक एअरबॅग आणि १ जानेवारी २०२२ पासून चालकासमोरील सहप्रवासी एअरबॅगच्या फिटींगची अंमलबजावणी अनिवार्य केली होती. www.konkantoday.com