
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या तज्ञ संचालकपदी भाजपा च्या जिल्हा कोषाध्यक्ष मुग्धा करंबेळकर यांची निवड
रत्नागिरी जिल्हा बँकेच्या संचालक मंडळावर चार्टर्ड अकाउंटंट मुग्धा करंबेळकर यांची तसेच रामेश किर विधी पदवीधर यांची तज्ञसंचालक म्हणून नियुक्ती संचालक मंडळाने केली . डॉ. चोरगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाने दोन संचालकांची एकमताने निवड केली.
मुग्धा करंबेळकर या भाजपा च्या जिल्हा कोषाध्यक्ष असून त्या 2013 बॅच च्या सी ए असून त्यांनी CS ही पदवी ही घेतली आहे .भाजपची संचालक संख्या आता 4 झाली आहे. भाजपा चे जिल्हा अध्यक्ष दीपक पटवर्धन यांनी निवडणुकी दरम्यान सागितल होत की संचालक मंडळ गठन होताना भाजप चे संख्याबळ वाढलेले असेल त्याची प्रचिती आज आली.
डॉ. चोरगे साहेबांनी दिलेल्या शब्दा नुसार आज संपूर्ण संचालक मंडळाच्या सहकार्याने आजची निवड पार पडली . बँकेचे संचालक मंडळ सहकाराला अभिप्रेत असलेले संचालक मंडळ झाले आहे. सर्वपक्ष , शेतकरी, व्यापारी , विधिज्ञ , शेती पदवीधर , शेतीविषयातील डॉक्टरेट, डॉक्टर, व्यावसायिक अश्या सर्व स्थरातील प्रतिनिधी या संचालक मंडळात आहेत.
रिझर्व्ह बँकेच्या निकषां नुसार चार्टर्ड अकाउंटंट, विधिज्ञ, कृषी तज्ञ, असे सर्व तज्ञ या संचालक मंडळात सदस्य आहेत. डॉ.चोरगे सरांन च्या नेतृत्वाखाली मध्यवर्ती बँक अधिक वेगवान आर्थिक व्यवहार करून नवा उच्चांक प्रस्थापित करेल.असा विश्वास सहकार क्षेत्रात वर्तवला जात आहे.
नवनियुक्त तज्ञ संचालकांचे सर्व स्थरातून अभिनंदन होत आहे.
www.konkantoday.com