योग्य ती लेखी हमी न मिळाल्यामुळे सीमा रानडे उपोषणावर ठाम
भूमिपूजन होवूनही अडीच महिने उलटले तरी वॉर्डातील महत्वाच्या रस्त्यांच्या कामाला सुरूवात झालेली नसल्यामुळे माजी नगरसेविका सीमाताई रानडे आजपासून उपोषणाला बसत आहे. गेले दोन दिवस प्रशासनाकडून त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. गुरूवारी सायंकाळी ५ वा. पालिकेत बैठकही घेण्यात आली. परंतु योग्य ती लेखी हमी न मिळाल्यामुळे आज शुक्रवार दि. १४ जानेवारीपासून उपोषणाला बसण्याच्या भूमिकेवर सौ. रानडे ठाम आहेत. www.konkantoday.com