राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचार्यांचे भवितव्य अनिश्चित
राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कामकाजामध्ये स्वायत्त संस्थांचा अंतर्भाव केल्याने येत्या काही महिन्यात हे अभियान थांबविण्याचे प्रयत्न सुरू असून त्यानंतर या प्रकल्पाचे पुढे काय होईल याविषयी या अभियानांतर्गत असणार्या कर्मचार्यांमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रीय आरोग्य अभियानात काम करणार्या २८ हजाराहून अधिक कंत्राटी कर्मचार्यांचे भवितव्य टांगणीला लागणार आहे. या प्र्रकल्पातील बहुतांशी कामे बाह्य संस्थांना देण्याचा प्रयत्न सुरू झाला असून काही ठिकाणी त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
www.konkantoday.com