
शिवसेना सचिव खा. विनायक राऊत दोन दिवस रत्नागिरी जिल्हा दौर्यावर
शिवसेना सचिव खा. विनायक राऊत दोन दिवस रत्नागिरी जिल्हा दौर्यावर येत आहेत. बुधवार दि. १२ जानेवारी रोजी ते चिपळूण शहरातील वाशिष्ठी व शिव नद्यांमधील गाळ काढण्याच्या ठिकाणांना भेटी देवून पाहणी करणार आहेत. याबरोबरच पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतानाच चिपळूण तालुक्यातील विविध विकास कामांची भूमिपूजन, उदघाटने कार्यक्रमांनाही उपस्थित राहणार आहेत. www.konkantoday.com