राज्यातील शाळा बंद करू नका, -महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशनची मागणी
राज्यातील गोरगरीब आणि उपेक्षित घटकातील मुलांकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात मोबाईल आणि ऑनलाईन शिक्षणासाठीची साधने उपलब्ध नाहीत.
शिवाय सध्या सुरू असलेली कोरोनाची तिसरी लाटही लहान मुलांवर फार प्रभावी ठरत नसल्याचे दिसून आल्याने राज्यातील शाळा बंद करू नका, अशी मागणी महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशनने (मेस्टा केली आहे. यासाठी मेस्टाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना पत्र लिहून शाळा बंद करू नये, अशी विनंती केली आहे.
www.konkantoday.com