महाबळेश्वरमध्ये हिमकणांची दुलई; नंदनवनाचा पारा शून्यावर

महाराष्ट्राचे नंदनवन महाबळेश्वरला थंडी वाढली असून महाबळेश्वरचा पारा शून्यावर केल्याने वेण्णालेक व लिंगमळा येथे हिमकण पडायला सुरवात झाली आहे. महाबळेश्वरला वाढलेल्या थंडीमुळे काश्मिरच्या हिमकण दुलईचा अनुभव पर्यटक व नागरिक घेत असल्याचे चित्र महाबळेश्वरमध्ये दिसू लागले आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाबळेश्वर शहर व परिसरात थंडीचा कडाका वाढला आहे . रात्री वेण्णा लेक परिसरात पर्यावरणप्रेमीनी महाबळेश्वर शहराच्या थंडीच्या तापमान तपासले असता महाबळेश्वरचा पारा शून्यावर असल्याचे तापमान मापकाने दर्शवले. महाबळेश्वर शहराची विविध रुपे पाहयला मिळतात . समुद्रसपाटीपासून तीन हजार फूट उंचावर असलेल्या शहरात कमालीची थंडीचा अनुभव पाहयला मिळतो.

वेण्णा लेक व लिंगमळा परीसरात गारठा महाबळेश्वर शहरापेक्षा जास्त तीव्रतेने जाणवतो.
हिमकण वेण्णालेकच्या परिसरात बोटीवर व झाडांच्या पानावर पाहयला मिळत आहेत. पर्यटक व सर्वसामान्याना महाबळेश्वरमध्ये हिमकण पाहायला मिळणं निसर्गाचा आविष्कार मानला जातो.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button