
गोगटे-जोगळेकर महाविद्यालय परिसरात शिरले दोन भलेमोठे अजगर
रत्नागिरी : शहरातील गोगटे – जोगळेकर महाविद्यालय परिसरात दोन दिवसांपूर्वी दोन भलेमोठे अजगर आढळून आल्याने खळबळ उडाली. हे अजगर गटारमार्गे नागरी वस्तीत आले. येथील कर्मचारी यांनी याची माहिती सर्पमित्रांना दिली. सर्पमित्र समीर लिंबूकर यांनी दोन्ही अजगरांना पकडून पोत्यात भरले. अजगरांना पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. या अजगरांना नैसर्गिक अधिवासात सोडले
पहा व्हीडीयो