रत्नागिरी : कृषी साहित्याचा होणारा काळाबाजार रोखण्यासाठी कोणत्या कृषी साहित्य विक्री केंद्रातून किती शेतकर्यांना कोणते आणि किती बियाणे, कीटकनाशके विकण्यात आली यांची नोंद ठेवण्यासाठी कृषी विभागाकडून लवकरच ‘ई-मॉनिटरिंग प्रणाली तयार करण्यात आली आहे. ही प्रणाली कार्यरत करून कृषी विभागाच्या योजनांच्या अंमलबजावणीत पारदर्शकता येणार आहे. खरीप आणि रब्बी हंगामाच्या सुरुवातीला बियाणे, कीटकनाशके, खतांची मागणी वाढत असल्याने कृत्रिम टंचाईद्वारे त्याचा तुटवडा निर्माण करून विक्रेते हे साहित्य चढ्यादराने विक्री करतात. यावर लक्ष ठेवणारी यंत्रणा असली तरी ती प्रभावी ठरत नसल्याचेही उघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाकडून महाआयटीच्या सहकार्याने ‘ई-मॉनिर्टंरग’ प्रणाली विकसित करण्यात आली आहे. त्यात ‘ई-इन्व्हेंटरी’, ‘ई-इन्स्पेक्टर’आणि ‘ई-लॅब’ या तीन वेगवेगळ्या ‘अॅप्लिकेशन’चा समावेश आहे. त्याद्वारे कृषी साहित्य विक्री केंद्रातील बियाणे, कीटकनाशकांच्या नोंदी ठेवल्या जाणारआहेत.
www.konkantoday.com