अर्धवट स्थितीत असलेले काम येत्या ८ दिवसात सुरू न झाल्यास लांजातील नागरिक व व्यापारी महामार्गावर चक्काजाम आंदोलन
मुंबई-गोवा महामार्गाच्या लांजा शहरातील रखडलेल्या कामामुळे लांजा शहरातील व्यापारी, नागरिक, वाहन चालक, प्रवाशी यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते आहे.प्रचंड धुळीने आजारही होण्याची शक्यता असून अर्धवट स्थितीत असलेले काम येत्या ८ दिवसात सुरू न झाल्यास नागरिकांसह महामार्गावर चक्काजाम आंदोलन छेडण्याचा इशारा लांजा नगरपंचायतीच्या नगरसेविका सौ. दुर्वा भाई शेट्ये यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन गुरुवारी ६ जानेवारी रोजी लांजा तहसीलदार तसेच आमदार राजन साळवी यांना सादर करण्यात आले.
www.konkantoday.com