चांदेराई येथील नदीपात्रात दारू पिऊन पडलेल्या कामगाराचा मृत्यू
रत्नागिरी : नदीच्या पात्रात दारू पिऊन पडून नेपाळी कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील चांदेराई येथे बुधवार ५ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता उघडकीस आली.
लालबहादूर इस्ती (४०, मूळ रा.कैलाली नेपाळ) असे मृत्यू झालेल्या नेपाळी कामगाराचे नाव आहे. याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत पुरण जिते बादी (२२,रा. नेपाळ, सध्या रा. चांदेराई) यांनी ग्रामीण पोलिसांना खबर दिली. त्यानुसार, लालबहादूर हा मंगळवार ४ जानेवारी रोजी रात्री चांदेराई येथील नदीच्या पात्रात पडला.५ जानेवारीला सकाळी १० वाजता तो नदीच्या पात्रात दिसून आला. याबाबत पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली असून अधिक तपास पोलिस करत आहेत.
www.konkantoday.com