
सिंधुदुर्गचे जिल्हा शल्य चिकित्सक श्रीमंत चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल
सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा रुग्णालयात काम करणार्या एका महिलेने आपला विनयभंग केल्याची तक्रार सिंधुदुर्गनगरी पोलिस स्थानकात दाखल केल्यानुसार सिंधुदुर्गचे जिल्हा शल्य चिकित्सक श्रीमंत चव्हाण यांच्या विरोधात सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सदर महिलेच्या तक्रारीनुसार भादंवी कलमा नुसार गुन्हे दाखल झाले आहेत. भाजपा महिला ओबिसी सेलच्या जिल्हाध्यक्षा तथा माजी जि.प. च्या अध्यक्षा सौ. दीपलक्ष्मी पडते यांनी याबाबत सोमवारी पोलिस स्थानकात सदर महिलेला पाठिंबा देवून पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
www.konkantoday.com