
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना माजी सभापती शौकत मुकादम यांचे कोकणला न्याय देण्याचे आवाहन
गेली सात-आठ वर्षे मुंबई-गोवा हायवेचे काम सुरु आहे. काम वेळीच पूर्ण होत नसल्याने अनेक अपघात, व्यापारी, शेतकरी यांचे नुकसान होत आहे. कोकणावर फार मोठे संकट आले आहे. दरवेळी ठेकेदार कंपन्या बदलत आहेत. एखाद्या कंपनीने काम सुरू केले की ते अर्धवट ठेवून जात आहेत. २२ जुलै रोजी महापूर आला. त्यावेळी हायवेचे काम अर्धवट असल्यामुळे काही ठिकाणी खोदाई तर काही ठिकाणी भराव यामुळेही पुराचे पाणी पसरले गेले. त्यामुळे बर्याच लोकांचे नुकसान झाले आहे. ना. गडकरी साहेब आपण केंद्रातले कर्तबगार मंत्री आहात व विशेष म्हणजे आपण महाराष्ट्राचे आहात. याचा आम्हाला अभिमान आहे. महाराष्ट्र हे तुमचे-आमचे एक घर आहे. घरातले लोक संकटात आहेत. आपण जातीने लक्ष घालून आम्हाला या हायवेच्या संकटातून बाहेर काढावे, अशी विनंती माजी सबापती शौकतभाई मुकादम यांनी केंद्रीय वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.
www.konkantoday.com