भाजप अधिकची कुमक पाठवत असेल तर प्रतिष्ठेच्या निवडणुकीत आमचे ही एक दोन मंत्री ठाण मांडून राहिले पाहिजे होते,-आमदार दीपक केसरकर यांची खंत
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत झालेल्या पराभवाचे आम्ही नक्की आत्मचिंतन करूच पण केंद्रीय मंत्री नारायण राणे जर जिल्ह्यात ठाण मांडूनही भाजप अधिकची कुमक पाठवत असेल तर प्रतिष्ठेच्या निवडणुकीत आमचे ही एक दोन मंत्री ठाण मांडून राहिले पाहिजे होते, अशी खंत आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केली.सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत भाजपचा मोठा पराभव होणार हे जेव्हा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी आमदार रवींद्र चव्हाण यांना राणे याच्या दिमतीला पाठवले पण आमच्या कडून तसे झाले नाही एक दोन मंत्री येथे ठाण मांडून बसले पाहिजे होते असे यावेळी केसरकर यानी सांगत खंत व्यक्त केली.तसेच आगामी निवडणुकीत मी ठाण मांडून बसणार असल्याचे सांगितले.
तसेच माजी जिल्हा बॅक अध्यक्ष सतीश सावंत याचा पराभव झाला असला तरी त्याना आता कोणते ही मोठे पद देणे गरजेचे असून त्यानी चांगली लढत दिली हे विसरून चालणार नाही त्याच्या मतदार संघात केंद्रिय मंत्री ठाण मांडून होते पैसे मोठ्याप्रमाणात वापर करण्यात आला असा आरोप ही केसरकर यांनी यावेळी केला.
www.konkantoday.com