पराभवाच्या दुःखापेक्षा थकीत कर्जदारांच्या नेतृत्वाखालील पॅनेलला मतदारांनी निवडून दिले याचे अधिक दुःख आहे, -सतीश सावंत
सिंधुदुर्गनगरी : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत धनशक्तीचा आणि दहशतीचा वापर झाल्यानी मतदारांनी नाहक त्रास नको म्हणून आमच्या विरोधी मतदान केले.आमचे कणकवली आणि देवगडचे मतदार गायब करून भाजपने हे यश मिळवले आहे. दैवाची साथ मिळाली नाही म्हणून माझा पराभव झाला. पराभवाच्या दुःखापेक्षा थकीत कर्जदारांच्या नेतृत्वाखालील पॅनेलला मतदारांनी निवडून दिले याचे अधिक दुःख आहे, अशी प्रतिक्रिया जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी निवडणूक निकालानंतर दिली.कणकवली आणि देवगड येथील आमच्या मतदार असलेल्या कार्यकर्त्यांना गायब करण्यात आले. त्यांचे मतदान न झाल्याने आम्हाला पराभव स्वीकारावा लागला.
मला आणि माझ्या विरोधी उमेदवाराला सम-समान मते असताना मला नशिबाची साथ मिळाली नसल्याने चिठ्ठीद्वारे झालेल्या निकालात मला पराभव पत्करावा लागला. माझ्या पराभवाच्या दुःखापेक्षा गेल्या साडे सहा वर्षात चांगले काम करूनही आणि एकही तक्रार नसताना थकीत कर्जदार यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलला मतदारांनी निवडून दिले याचे दुःख अधिक आहे.
www.konkantoday.com