
क्रेडाईच्यावतीने रेडीरेकनर संदर्भात मुद्रांक जिल्हाधिकार्यांशी चर्चा.
क्रेडाई रत्नागिरी संस्थेने सह. जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी यांची भेट घेवून रेडीरेकनरसंदर्भात चर्चा केली.सन २०२५-२६ या वार्षिक बाजारमूल्य तक्त्यामधील दरात वाढ न होण्याबाबत तसेच महाराष्ट्र वार्षिक मूल्यांकन अधिनियम मार्गदर्शक सूचना व वार्षिक मुद्रांक मूल्यावर तक्ते हे दोन्ही भाग वेगवेगळे प्रसिद्ध करण्याबाबत व मार्गदर्शक सूचना तळटीपामध्ये काही अपेक्षित बदलांबाबतच्या विषयांवर सकारात्मक चर्चा करुन संस्थेतर्फे निवेदन देण्यात आले.यावेळी अध्यक्ष नित्यानंद भुते, उपाध्यक्ष महेश गुंदेचा, समीर सावंत, ट्रेजरर महावीर जैन, बोर्ड मेंबर प्रदीप कट्टे आणि दिनेश जैन उपस्थित होते. लवकरच या बाबात शासनाकडून सकारात्मक निर्णय होईल, असे सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्याकडून सांगण्यात आले.www.konkantoday.com