निवासी डॉक्टरांच्या संपानंतर देशभरातील आरोग्य सेवा ठप्प होणार
नीट-पीजी समुपदेशनास दिरंगाई आणि दिल्ली पोलिसांच्या कारवाईविरुद्ध दिल्लीतील निवासी डॉक्टरांच्या संपानंतर देशभरातील आरोग्य सेवा ठप्प होताना दिसत आहे.देशभरातील निवासी डॉक्टरांच्या संघटना आरोग्यसेवा पूर्णतः बंद ठेवणार असून, महाराष्ट्रासह अनेक राज्यातील निवासी डॉक्टरांनीही संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबईतील केईएम आणि सायन इस्पितळाच्या निवासी डॉक्टरांच्या संघटनेने सांगितले की, ३० डिसेंबरपासून दुपारी २ वाजेनंतर बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी), आपत्कालीन आणि अतिदक्षता सेवा बंद केली जाईल. आसाम, पंजाब, उत्तर प्रदेश, ओडिशासह अनेक राज्यांतील निवासी डॉक्टरांच्या संघटनांनीही संपात सहभागी होणार असल्याची घोषणा केली आहे.
www.konkantoday.com