पत्नीला लोखंडी रॉडने मारहाण पतीविरुद्ध गुन्हा दाखल

कोंड्ये ता. चिपळूण येथील राहणार्‍या सौ. उज्वला नलावडे यांना मारहाण केल्याच्या आरोपावरून त्यांचे पती शरद नलावडे यांच्याविरोधात चिपळूण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
हा प्रकार चिपळूण शहरातील घरकुल हॉटेलजवळ घडला. यातील फिर्यादी व आरोपी हे पतीपत्नी असून आरोपी हे फिर्यादीला नेहमी शिवीगाळ व धमकी देत असत. फिर्यादी ही बाजारात आली असता आरोपी यांनी फिर्यादी यांना तू घरी चल असे सांगितले परंतु फिर्यादीने जाण्यास नकार दिला. त्यामुळे आरोपीने रागाने रस्त्यावर पडलेल्या लोखंडी रॉड उचलून फिर्यादीच्या डाव्या हातावर व पायावर मारून दुखापत केली.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button