संपावर चर्चेतून तोडगा काढण्यासाठी आम्ही तयार, मात्र विलिनीकरणाच्या मुद्यावर ठाम,एसटी कर्मचार्यांची भूमिका
चर्चेसाठी आम्ही तयार असून, राज्य सरकारनं आम्हाला बोलवावं, अशी भूमिका आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. या संपावर चर्चेतून तोडगा काढण्यासाठी आम्ही तयार आहोत, मात्र विलिनीकरणाच्या मुद्यावर ठाम असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.आम्हालाही या मुद्यावर तोडगा निघावा असे वाटत असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रथमच आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून सामंजस्याची भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे.
परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज विधीमंडळात बडतर्फच्या कारवाया मागे घेणार नाही असे वक्तव्य केले होते.
www.konkantoday.com