शुभम शिवलकर दांडेकर मानचिन्ह अभिनय स्पर्धेचा विजेता

गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी येथे झेप महोत्सवांमध्ये नुकत्याच पार पडलेल्या दांडेकर अभिनय स्पर्धेतचे विजेतेपद शुभम शिवलकर या टी वाय बीए च्या विद्यार्थ्याने मिळवले, द्वितीय क्रमांक आर्या वंडकर( एफ वाय बी ए), तृतीय क्रमांक साक्षी सागवेकर (एफ वाय बी कॉम) या विद्यार्थिनीने मिळवला. पन्नास वर्षाची परंपरा असलेला दांडेकर अभिनय मानचिन्ह या सन्मानाच्या स्पर्धेत एकपात्री अभिनय स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेसाठी श्री राजेश गोसावी आणि श्रीमती भाग्यश्री बापट- घाग स्पर्धेला स्पर्धक म्हणून लाभले होते. राजेश गोसावी सतत प्रयोगशील नाट्यकर्मी म्हणून प्रसिद्ध आहेत तसेच भाग्यश्री बापट-घाग गोगटे जोगळेकर महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी- दांडेकर मानचिन्ह विजेती कलाकार आहे. दांडेकर मानचिन्ह अभिनय स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला या स्पर्धेच्या आयोजनासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.आनंद आंबेकर आणि प्रा. शुभम पांचाळ यांनी विशेष प्रयत्न केले सर्व विजेत्यांचे प्रभारी प्राचार्य डॉ.प्रफुल्लदत्त कुलकर्णी यांनी अभिनंदन केले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button