
खेड शहरात लोकार्पणानंतरही शौचालय बंदच
खेड शहरातील नगरपालिकेच्या पाठिमागील पार्किंग जागेलगत सुवर्णजयंती जिल्हास्तर नगरोत्थान योजनेतून २८ लाख ९२ हजाराचा निधी खर्चून सार्वजनिक शौचालय उभे करण्यात आले आहे. या शौचालयाचे लोकार्पण झाले. मात्र अद्यापही सार्वजनिक शौचालय नागरिकांसाठी खुले झालेले नाही. काम अपूर्ण असतानाही सत्ताधारी व विरोधकांकडून लोकार्पणाचा अट्टाहास नेमका कशासाठी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
www.konkantoday.com