इंधन अपहार प्रकरणी गुन्हा दाखल करा खेडमध्ये शिवसेना नगरसेवकांची मागणी; तहसील कार्यालयासमोर उपोषण
खेड : नगर परिषदेच्या २३ लाख ९२ हजार ७५० रुपये इतक्या निधीच्या इंधन अपहार प्रकरणी राज्य शासनाच्या अवर सचिव यांनी गुन्हा दाखल करण्याच्या लेखी सूचना करून देखील जिल्हाधिकारी यांनी गुन्हा दाखल न केल्या प्रकरणी शुक्रवारी दि. २४रोजी पालिकेतील सर्व शिवसेना नगरसेवक व शिवसेना पदाधिकारी यांनी या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी खेड तहसीलदार कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले. यावेळी या प्रकरणात सहभाग असल्याने नगराध्यक्ष वैभव खेडेकर व संबंधित सर्व कर्मचा-यांविरोधात कारवाई व्हावी, या मागणीकरिता घोषणाबाजी करण्यात आली. खेड नगर परिषदेत आर्थिक घोटाळा झाल्याच्या तक्रारी शिवसेनेकडून करण्यात आल्या असून त्यामध्ये नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांचा सहभाग असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. त्यामधील इंधन अपहार झाल्याबाबत शिवसेनेचे गटनेते प्रज्योत तोडकरी व नऊ नगरसेवकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार केली होती.
www.konkantoday.com