जे एसटी कर्मचारी अद्यापही कामावर परतले नाहीत, त्यांच्यावर आजपासून पुन्हा एकदा करवाईचा बडगा
विलिनीकरणाच्या मुख्य मागणीसह आपल्या अन्य मागण्यांसाठी गेल्या महिन्याभरापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप चालू आहे. यादरम्यान अनेकांनावर निलंबनाची कारवाई देखील करण्यात आली आहे.
मात्र जे कर्मचारी कामावर परततील त्यांच्यावरील सर्व कारवाया मागे घेण्यात येतील, असे अश्वासन परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिले होते. परब यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत गेल्या दोन दिवसांमध्ये दोन हजारांपेक्षा अधिक कर्मचारी कामावर परतले आहेत. कर्मचाऱ्यांना कामावर परतण्यासाठी 23 डिसेंबरची मुदत देण्यात आली होती. आता ही मुदत संपल्याने जे एसटी कर्मचारी अद्यापही कामावर परतले नाहीत, त्यांच्यावर आजपासून पुन्हा एकदा करवाईचा बडगा उगारण्यात येणार असून त्यांना बडतर्फ करण्यात येणार आहे.
www.konkantoday.com