
मुंबई-गोवा महामार्गालगतच्या पाली बाजारपेठेत दिवसा घरफोडी; दहा तोळे सोने, साडेचार लाखांचा ऐवज लंपास
मुंबई-गोवा महामार्गालगतच्या पाली बाजारपेठेतील मराठवाडी भागात अज्ञात चोरट्याने घरफोडी करून दहा तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा मिळून सुमारे ₹4,88,075 किंमतीचा मुद्देमाल लांबविल्याची घटना घडली आहे. या दिवसा-दिवसाच्या चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रमेश मधुकर सावंत हे रिक्षा व्यवसाय करतात. 19 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 5.35 ते 7.15 वाजण्याच्या दरम्यान ते, त्यांची पत्नी व मुलगा घराबाहेर असताना अज्ञात चोरट्याने घराच्या मागील दरवाजाचा कडीकोयंडा तोडून प्रवेश केला. त्यानंतर लोखंडी कपाट उचकटून चोरट्याने सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली.




