शासनाच्या योजनांचा गैरफायदा ,नप कडे आलेल्या अर्जात चक्क साठ हजार च्या मोबाइलसाठी व किराणा माल भरण्यासाठी लाखांची आर्थिक मदत मिळावी म्हणून अर्जदारांची मागणी
गरजू व मदतीची आवश्यकता असणार्या व्यक्तींना मदत मिळावी म्हणून शासनाने विविध योजना आखल्या आहेत त्याद्वारे विविध गरजूंना मदत केली जाते मात्र शासनाच्या या आर्थिक मदतीचा अनेक जण फायदा उठवत असतात रत्नागिरी नगरपरिषदेच्या दिव्यांगाच्या मदत देण्याबाबत आलेल्या अर्जातून हा प्रकार उघड झाला आहे
रत्नागिरी नगर पालिकेच्या दिव्यांगासाठी राखीव असलेल्या पाच टक्के निधीतून अर्थसहाय्य मिळण्यासाठी दिव्यांगांनी केलेल्या अर्जात अवास्तव मागणी केल्याचे पुढे आले आहे. तब्बल ६० हजारांचा मोबाईल, किराणा माल भरण्यासाठी तब्बल १ लाख ६२ हजार रुपये तर सायकलसाठी सव्वा लाखाची मागणी करण्यात आली होती. ज्येष्ठ नगरसेविका सौ. स्मितल पावसकर यांनी सभागृहात अवास्तव मागणी विषय चर्चेला आणल्यानंतर सभागृहात गोंधळ उडाला. विरोधकांनीही याला पाठिंबा दिला. दिव्यांगाना मदत करा. मात्र मदतीला योग्य विनियोग होतो का? हे पहातयं कोण? यावर प्रशासनाला उत्तर देता आले नाही. त्यामुळे प्रत्येक वस्तूची किंमत ठरवूनच दिव्यांग लाभार्थीना यापुढे मदत देण्यात यावी, असा ठराव या सभेत मंजूर झाल या वेळी हा प्रकार उघड झाल्याने सर्वांच्या समोर आला मात्र याआधी दिलेल्या मदतीच्या वेळी हे निकष पाळले होते का अशा अवास्तव मागण्या मंजूर कशा केल्या जातात त्यामागे कोणाचे हितसंबंध आहेत का हा प्रश्न अनुत्तरित राहिला आहे www.konkantoday.com