
१२आमदारांचं निलंबन हे काही कुठला विषय डोळ्यासमोर ठेवून केलेलं नव्हतं -अजित पवार
आमदारांचं निलंबन हे काही कुठला विषय डोळ्यासमोर ठेवून त्यावेळी अजिबात केलेलं नव्हतं.असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिले त्यावेळी सभागृहातील परिस्थिती ज्यांनी ज्यांनी पाहिली, त्यांना माहिती असेल किंवा आम्ही तर अनेक अधिवेशनं पाहिलेली आहेत. कधी कधी एखादा विषय खूप तापल्या जातो, खूप टोकाची चर्चा त्यामध्ये होते. परंतु काही शारिरीक किंवा काही वेगळी भाषा जी विधीमंडळ कामकाजात योग्य ठरत नाही, अशाप्रकारची भाषा वापरली गेली आणि नेमकं ती नावं काढताना ती १२ निघाली आणि नेमकं राज्यपाल मोहदयांना १२ आमदरांची नावं कॅबिनेटचा ठराव करून मुख्यमंत्र्यांनी पाठवलेली होती. त्यामुळे काहींनी असा समज करून घेतला की ती १२ होत नाहीत, म्हणून ही १२ कमी केली. मी माध्यमांद्वारे समस्त जनतेला सांगू इच्छितो की, असं अजिबात घडलेलं नाही.”
www.konkantoday.com