
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ उपलब्ध करून देणार,संशोधनावर आधारित ध्वनिचित्रफित
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष असून या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये विद्यापीठाच्या सर्व संशोधन केंद्रांवर विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून विद्यापीठाने आतापर्यंत विकसित केलेले तंत्रज्ञान शेतकर्यांपर्यंत ध्वनिचित्रफितींच्या माध्यमातून पोहोचविण्यात येणार आहे.
संशोधनावरील आधारित ध्वनिचित्रफिती शेतकर्यांपर्यंत पोहोचावीत यासाठी विस्तार शिक्षण संचालनालयाने संशोधन, शिक्षण व विस्तार या माध्यमातून विकसित केलेल्या तंत्रज्ञानाच्या विविध ध्वनिचित्रफितींचे संकलन करण्यात आले आहे. त्याचे विमोचन दि. २६ जानेवारी २०२२ रोजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत, आंतरराष्ट्रीय भात संशोधन, संस्था (ईरी) फिलीपाईन्सचे संचालक, डॉ. अजय कोहली आणि नवी दिल्ली स्थित आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्थेचे दक्षिण आशियाचे संशोधन सल्लागार यु. एस. सिंग यांच्या हस्ते करण्यात आले. या ध्वनिचित्रफितींची सॉफ्ट कॉपी शेतकर्यांसाठी उपलब्ध असून जास्तीत जास्त शेतकर्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत आणि संचालक, विस्तार शिक्षण, डॉ. संजय भावे यांनी केले आहे.
www.konkantoday.com