
चिपळूण शहरात अस्वच्छता करणे आता पडणार महागात,नियम तोडणार्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय
एकीकडे स्वच्छ शहर-सुंदर शहर, माझी वसुंधरा यांसारखे विविध उपक्रम राबवून शहराच्या सौंदर्यात भर घालण्याचा प्रयत्न सुरू असतानाच उघड्यावर टाकण्यात येणारा कचरा, अन्य घाण, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, लघुशंका करणे एवढेच नव्हे तर शौच करणे आदींसारखे काही प्रकार समोर येत आहेत. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येवू शकते. प्लास्टिक व थर्माकोल यांच्या वापरामुळे पर्यावरणाच्या हानीबरोबरच प्रदूषणाचा मुद्दाही जटील बनत चालला आहे. यावर रामबाण उपाय शोधत येथील नगर पालिका प्रशासनाने शहरात अस्वच्छता करणार्या नागरिकांवरच थेट दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून घरातील ओला व सुका कचर्याचे वर्गीकरण न करणार्या रहिवाशांवरही या कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. www.konkantoday.com