
कशेडी बोगद्यातील प्रवास दुचाकीस्वारांसाठी धोकादायक.
कशेडी बोगद्यातील प्रवास दुचाकीस्वारांसाठी धोकादायक ठरत आहेमुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यातील गणेशभक्तांचा प्रवास वेगवान अन् आरामदायी झाला असला तरी दुचाकीस्वारांचा जीव टांगणीवर आहे.बोगद्यातील चिखलमय निसरड्या रस्त्यावर दुचाकी घसरून होणाऱ्या अपघातांमुळे वाहनचालकांचा जीव टांगणीवर आहे. दुचाकींना घडणाऱ्या अपघातांमुळे वाहतूक कोंडीत देखील भर पडत आहे. यामुळे कशेडी बोगद्याच्या प्रवेशद्वाराजवळ तैनात कशेडी वाहतूक पोलिसांची त्रेधातिरपीट उडत असून डोकेदुखी कायम आहे.कशेडी बोगदा वाहतुकीसाठी खुला झाल्यापासून चर्चेचा विषय ठरला आहे