भाजपा युवा कार्यकर्त्यांनी केली रत्नागिरी शहरातील रस्त्यांच्या निष्कृष्ट कामाची पोलखोल.
प्रतिनिधी :
रत्नागिरी : रत्नागिरी शहरात होत असलेल्या रस्त्यांच्या कामाबाबत नागरिकांमधून शंका उपस्थित केली जात आहे. होत असलेले काम निकृष्ट दर्जाचे होत नाही ना असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आज रत्नागिरी शहरातील बाजारपेठ येथे झालेल्या रस्त्यांच्या कामात हळगळजीपणा झाल्याचा आरोप भाजपा युवा कार्यकर्त्यांनी केला. येथे करण्यात आलेले रस्ते दोन दिवसातच वर आले असून रस्त्यात खड्डे पडू लागले आहेत. जनतेच्या किशातून जात असलेला कररूपी पैसा विकास कामात वापरला जात असतो मात्र निकृष्ट कामामुळे जनतेचा पैसा वाया जात असल्याचा आरोप युवा कार्यकर्त्यांनी केला. प्रतिवर्षी रस्त्यांवर पडणारे खड्डे पाहता आम्हाला व शहर वासीयांना शाश्वत विकास आवश्यक आहे असे युवा कार्यकर्त्यांनी म्हटले. होत असलेल्या कामाची चौकशीव्हावी अशी मागणी देखील या पूर्वी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आल्याचे देखील सांगितले.
यावेळी युवा भाजपा कार्यकर्ते संदीप सुर्वे, निलेश आखाडे, विक्रम जैन,दादा ढेकणे,हर्षल घोसाळकर आदी उपस्थित होते.